एकांत -
मन अस्वस्थ झाले असेल, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली असेल, चिंतन कारावेसे वाटत असेल किंवा काय काराव सुचत नसेल त्या वेळी एखाद्या बंद खोलीत एकटेच बसून राहण्याची प्रक्रिया.
एक छोटीशी कथा -
Doorbell वाजली. आमच्या हिने दार उघडले. पाठीवरचं दप्तराचे ओझे बाहेरच्या सोफ्यावर टाकले गेले, आदळले गेले. ती पावलं तशीच पुढे वेगाने bedroom कडे धावू लागली. Bedroom मध्ये गेल्यानंतर दार जोरात आदळण्याचा आवाज झाला. दार बंद झाले. मी आणि माझी पत्नी दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. एक तास उलटून गेला. दार अजूनही बंदच होते.
मी काळजीने पत्नीकडे पाहिले आणि तिला विचारावसं वाटलं की, "नेमक काय झाल असेल? मला बोलायचं आहे त्याच्याशी/तिच्याशी."
पत्नीने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "भिनसल असेल काहीतरी त्याचे/तिचे कॉलेजमध्ये, मित्रांशी, येत-जाता कुणाशीतरी किंवा प्रवासात, ट्रेनमध्ये-बसमध्ये, घेऊ देत ना तिला/त्याला तिचा वेळ."
मी म्हटलं,
"हो जरूर घेऊ देत पण हे नेहमीचे होत आहे त्याचे/तिचे आणि हे मला चुकीचे वाटत आहे. भीती वाटते की हे असं स्वतःला खोलीत बंद करून तासनतास एकटं राहणं म्हणजे....."
पुढे एकही शब्द उच्चारायला मला जमल नाही.
कंठातून निघणाऱ्या शब्दांना डोळ्यातले अश्रू रोखू पाहत होते.
जेवणासाठी दार ठोकावले पण आतून भूक नसल्याचा आवाज आला. आम्ही दोघांनी जेवण आटपले. संध्याकाळ दाटू लागली. मावळतीची किरणे घरात शिरत होती. यावेळी मी स्वतः:च ते दार ठोकावले. आतून फक्त "हम्म्म" चा हुंकार आला आणि बाहेर आम्ही दोघांनी मोठा श्वास सोडला. मी दार पुन्हा अलगद ठोकावले. आतून कडी उघडण्याचा आवाज आला. किचनमध्ये काम करणारी माझी पत्नी धावत बाहेर आली. आतून तो/ती मान खाली करून समोर उभा/उभी होता/होती. मी त्याला/तिला फ्रेश होण्यासाठी वाट मोकळी करून दिली. मी पत्नीसहित किचनमध्ये गेलो. माझ्या हाताने गरमागरम मसाले चहा बनवू लागलो. माझ्या हाताचा चहा त्याला/तिला फार आवडतो.
ट्रे मध्ये तिघांचा चहा घेऊन हॉल मध्ये आलो. मी मध्ये वातावरण मोकळे करण्याचा प्रयत्न करतच होतो. तिघांचाही चहा पिऊन झाला.
मी त्याच्याकडे/तिच्याकडे पाहत हसऱ्या आवाजात म्हणालो,
'काय मग कसा झाला आहे चहा?'
तो/ती : छान झाला आहे.
मी : मसाला जरा जास्त पडला आहे का रे? आई म्हणत होती तस मला की जरा कमी टाक मसाला असं पण मी म्हटलं ह तिला, तुला जास्त मसाला असल्याचाच चहा आवडतो असं. (पुढे खोटे हसणे सुरु होते.)
तो/ती : नाही, बरोबर आहे मसाला यात. अगदी बरोबर.
मी : मी नेहमीच मस्त चहा करतो.
काही वेळ शांतता पसरली. संध्याकाळचे उन्ह घरात खेळून गेले. मी त्याच्याजवळ/तिच्याजवळ जाऊन बसलो. विश्वासाने हातात हात घेतला आणि हलक्या आवाजात विचारले.
मी : काय झालं बाळा तुला? कुणाशी भांडण झाले आहे का तुझं?
तो/ती : काही नाही, असच.
मी : कुणी मित्र किंवा मैत्रीण काही बोलले का तुला?
तो/ती : नाही काही नाही.
मी : मग बर नाही का वाटत आहे तुला?
तो/ती : नाही पप्पा. हे असं काहीही नाही झालं मला. मी पूर्णपणे ठीक आहे.
मी : मग मगाशी स्वतःला कोंडून का घेतलं होतस?
तो/ती: मला एकांत हवा होता जरा,म्हणून...
मी : एकांत? नेमका कशासाठी?
तो/ती : बरीच कारणे आहेत त्याला.
मी: सांग एखादं. आम्हालाही आवडेल ऐकायला.
तो/ती: नाही नको. त्यात सांगण्यासारखं असं काही नाही.
मी : बर हरकत नाही. पण तुझ्या एकांतपणे राहण्याने ते सगळे विचार संपले का?
तो/ती : असतील किंवा नसतीलही.
मी : हे बघ कुणाच्याही एकांत राहण्याच्या सवयीला मी मुळीच नाकारत नाही. मुळीच नाही. उलट बहुतेकदा ते चांगलेही असते. या अशा एकांत राहण्याने कित्येकदा सगळे प्रश्न सुटतात. जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. पण प्रत्येक वेळी हा असा एकांत जवळ बाळगणे चांगले नसते. त्याने तो एकांत त्यातून निघणारी सारी स्पंदने मग मनावर हावी होतात आणि लहान लहान गोष्टींसाठी आपण तोच पर्याय निवडतो. याने काय होत ठाऊक आहे का मनातली सगळी सकारात्मक स्पंदने नष्ट होतात आणि फक्त आणि फक्त नकारात्मक स्पंदने मनात रुतली जातात.आणि हे अगदी जास्त झालं ना की ती सगळी स्पंदने मनावर कधी ताबा घेतात आणि तुमच्याकडून काय काय करून घेतात त्याची तुम्हाला कल्पनाही नसते. राग करणे, चिडचिड करणे, उगाचच एखाद्या गोष्टीत त्रुटी शोधणं आणि कधी कधी तर.... "
(समोर त्याच्या/तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते)
तो/ती: मग अशा वेळी नेमकं काय कराव?
मी : बोलायचं. जवळ जो कुणी असेल त्या व्यक्तीशी बोलायचं. माझ्याशी, आईशी, तुझ्या एखाद्या जवळच्या मित्राशी-मैत्रिणीशी, बोलायचं.
तो/ती : पण मी बोलून समोरच्या व्यक्तीला ते समजतच नसेल तर?
मी : आणि समजले तरी असा काय फरक पडणार आहे? तुझं सांत्वन करणे या गोष्टींशिवाय समोरच्या व्यक्तीकडे काहीच पर्याय नसणार आहे.
तो/ती : मग यातून फायदा काय मग?
मी : फायदा? तुला नेमका कसला फायदा हवे आहे? आणि गेल्या तीन-चार तासात स्वतःला कोंडून तुला कसला फायदा झाला? उलट नुकसानच झालंय किती सार.
तो/ती : तोटा? कसल नुकसान झाल पप्पा नेमक?
मी : बघ बघ, राग-राग केलास, चिडचिड केलीस,बेडरूमच दार किती मोठ्याने आपटलेस तू आई केवढ्याने घाबरली तुझी. दुपारी जेवली देखील नाहीस.
तो/ती : I am sorry पप्पा.
मी : पुन्हा असं स्वतःला कोंडून घेणार नसशील तर घेतो ह मी तुझं sorry. (मी आणि माझी पत्नी हसायला लागलो) जे काही असेल ते मोकळेपणे बोलायचं, चर्चा करायची. मन हलकं करून घ्यायचं म्हणजे काही वाटत नाही.
तो/ती : हो नक्कीच पप्पा.
आणि त्या तिच्या/त्याच्या एकांताचा शेवट माझ्या आणि माझ्या पत्नीच्या गॉड मिठीत झाला.
तात्पर्य : __________________________________________
(तुमचा तुम्हीच निवडा... म्हणजे तुम्हाला तुमच्या एकांताचा अर्थ समजेल, बरोबर ना.)
https://www.facebook.com/dalvinileshs/posts/3016509811761351
https://www.instagram.com/p/B_KJ1vqFPhB/?utm_source=ig_web_copy_link
No comments:
Post a Comment